Sunday, February 5, 2012

ती...एक पणती!

'ती' एक पणती
अवघ्या अंधार रात्री
नक्षत्रांच्या करणारी
दिवसातले सारे सारे क्षण
उजळून टाकणारी
भवताली दाटून येणारा
गहन अंधार
आपल्यातच बंदिस्त करून
आपल्यातील मोहक क्षणांनी
इतरांना फुलवणारी...













'ती' आहे स्निग्ध प्रकाशमय
आपल्यातील
आनंद लहरींनी मनं मनं चेतवणारी
आपल्यातील तेजाचे लखलखीत दीप
आपल्या भवताली वर्षानुवर्षे उजळून
दीपोत्सव साजरा करणारी
माझ्यात स्वतःसह
खोलवर गुंतलेली, रुतलेली... तरीही
तरीही... मला गहन, गूढ वाटणारी
माझी आवडती 'ती'
माझीच
केवळ माझीच
'ती' एक पणती..!

Followers