मासेमारी हातातला गळ पाण्यात टाकुन मासे पकडत असतो. विस्मयचकित होउन तो इसम मासेमाऱ्याजवळ जाऊन विचारतो,"अशा रितीने तू किती वेळ मासे पकडतोस?"
"जास्त नाही, थोडा वेळच" मासेमारी उत्तरला.
"अरे पण जाळ वापरून तू जर जास्त वेळ मासेमारी केलीस, तर तू भरपूर मासे पकडू शकतोस!"
"यावर माझं आणि माझ्या परिवाराच पोट भरत, जास्त मास्यांच मी काय करणार?" इति मासेमारी.
"पण मग तू इतर वेळ काय करतोस?"
"मी सकाळी गरजे पुरते मासे पकडतो. नंतर माझ्या मुलांसोबत खेळतो, बायको सोबत गुजगोष्टी करतो, फिरायला जातो, एखादं पुस्तक वाचतो, संध्याकाळी मी मित्रांना भेटतो, त्यांच्या सोबत गप्पा मारतो, गिटार वाजवतो, गाणी गातो आणि रात्रि लवकर झोपी जातो. अशा रितीने माझा दिवस संपतो।"
मधातच अडवत तो इसम म्हणाला,"हे बघ, मी मुंबई विद्यापिठातुन MBA केलेलं आहे. मी निश्चितच तुझी मदत करू शकतो. तू दिवसाचा जास्तीत जास्त वेळ मासेमारी कर. अतिरिक्त मासे विकून तू एक नवी मोठी होडी विकत घेऊ शकतोस!"
"त्या नंतर मग?" मासेमाऱ्याने विचारले.
"मोठी बोट असल्यामुळे तुझ्या कमाईत निश्चितच भरपूर वाढ होईल. मग कमाईचे पैसे वाचवून तू आणखीन एक होडी विकत घे. मग दूसरी, तीसरी.. अशा रितीने काही कालावधीतच तुझ्याकड़े होड्यांचा ताफा तयार होईल."
"बरं.. मग?"
"नंतर तू स्वयंचलित जहाजं सुद्धा घेऊ शकतोस ज्यामध्ये मोठं-मोठ्या यंत्रांद्वारे मासेमारी केली जाते. तुझे उत्पादन वाढल्यावर तू मासे मध्यस्थला न विकता स्वतःच व्यापार करू शकतोस. मग तू हे लहानस गाव सोडून मुंबईला जाऊ शकतोस आणि तिथेच तुझा मोठा व्यापार मार्गी लाऊ शकतोस!"
"असं का? याला एकंदरीत किती वेळ लागेल?" गळाला लागलेला मासा जवळच्या पिशवीत टाकत मासेमाऱ्याने विचारले.
"जवळपास वीस-पंचवीस वर्षे!"
"मग पुढे?"
"पुढे? या नंतरच तर खरी मज्जा आहे मित्रा! जर तू इतका मोठा व्यापारी बनलास तर लाखो-करोडो रुपये कमवू शकतोस!"
"लाखो? खरच?? आणि त्यानंतर?"
"अरे त्यानंतर मग कामातुन निवृत्त होऊन तू समुद्र किनारच्या एखाद्या लहानशा सुंदर गावात स्थायिक होऊ शकतोस, आरामात जीवन कंठु शकतोस, बायको-मुलां सोबत वेळ घालवू शकतोस आणि संध्येला मित्रांसोबत मजा करू शकतोस..!"
तो मासेमारी स्मित करत आणि हातातला गळ पुन्हा पाण्यात टाकत म्हणाला,"मग मी आता वेगळं काय करतोय?!"